Ad will apear here
Next
गुंतवणूक करण्यापूर्वी हे पूर्वग्रह दूर करा
मी एके दिवशी आइस्क्रीमच्या दुकानात गेलो होतो; पण तिथे माझ्या आवडीचे अलमंड चॉकलेट-चिप हे आइस्क्रीम नव्हते. मी बाकी कोणतेच आइस्क्रीम खाणार नाहीये, हा विचारही माझ्या डोक्यात आला नाही, इतक्या सहजपणे मी दुकानातून बाहेर आलो. आइस्क्रीम निवडण्याइतके गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे सोपे नसते आणि म्हणूनच, क्षणक्षणाला बदलत असणाऱ्या बाजारातील एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला पुढील पूर्वग्रहांपासून दूर राहणे गरजेचे आहे. ‘इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स’ आणि ‘शेअरखान बाय बीएनपी पारिबा’चे प्रमुख गौतम कालिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे.  
........................................................................
नवे पर्याय शोधा
गौतम कालियाहा तुमचा कॉलेजमधला पहिलाच दिवस आहे आणि तुम्हाला हायस्कूलमधला ओळखीचा चेहरा दिसतो. तुम्हाला आनंद होतो. तुम्ही त्या व्यक्तीला ओळख दाखवता आणि तिच्याजवळच्या जागेवर बसता. काही वेळा, कम्फर्ट झोन घातक ठरू शकतो. गुंतवणुकीच्या दिशेने प्रवास सुरू करत असताना, आपण फिक्स्ड डिपॉझिट, पीपीएफ व अन्य माहितीच्या पर्यायांना शक्यतो प्राधान्य देतो; पण आता तुमची कक्षा वाढवण्याची आणि दीर्घकालावधीमध्ये समृद्ध करू शकतील, असे नवे पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. कम्फर्ट झोनमधून बाहेर या.  

बहुसंख्यांचे नेहमीच बरोबर असते असे नाही
केवळ निवडणुकीच्याबाबतीत मताधिक्य महत्त्वाचे असते, गुंतवणुकीच्या नाही. डॉटकॉम बबल ते २००८मधील आर्थिक मंदीपर्यंत बहुतेकशा प्रमुख समस्या गुंतवणूकदारांना इतरांचे ऐकून निर्णय घेतल्याने, मौखिक प्रसिद्धीवर किंवा कोणच्या तरी सल्ल्यावर विश्वास ठेवल्याने तीव्र झाल्या आहेत. त्यामुळेच, म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स यातील गुंतवणूक हा आपल्यासाठी वैयक्तिक निर्णय असतो, आपल्या उद्दिष्टांवर व किती कालावधीमध्ये ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत, यावर अवलंबून असतो. त्यामुळे, तुमच्यासाठी स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडांची निवड तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना करायला सांगितली, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. गुंतवणुकीच्याबाबतीत तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

वर्गापेक्षा वेगळा विचार करा
परीक्षागृहापासून हा पूर्वग्रह कायम आपल्याबरोबर असतो. तुम्ही लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत, हे चाचपून पाहण्यासाठी तुम्ही इतरांबरोबर ती ताडून पाहिल्याचे व खातरजमा केल्याचे आठवा. गुंतवणुकीच्या बाबतीतही हे लागू होते. गुंतवणूक करण्याच्या तुमच्या निर्णयाला पूरक ठरेल, अशी स्टॉक किंवा म्युच्युअल फंड योजनेविषयीच्या माहितीवर अधिक भर देण्याचा किंवा विश्वास ठेवण्याचा तुमचा कल असतो, तर नको असलेल्या माहितीकडे दुर्लक्ष केले जाते. उदाहरणार्थ, तेजी-मंदीच्या बाजारात तुम्हाला स्मॉल-कॅप व मिड-कॅप सोयीचे वाटत असतील तर तुमच्या मतांना दुजोरा देतील अशा त्याविषयीच्या लेखांवर, नसाइटवर व बातम्यांवर सातत्याने तुमचे लक्ष असते. खातरजमा करण्याचा हा पूर्वग्रह तुम्ही कायम ठेवला तर एक दिवस तुमच्या भीतीही खऱ्या ठरून त्यांची खातरजमा होईल.


सद्यस्थितीमध्ये राहा
अक्षरशः कपडे बदलल्याप्रमाणे आपण स्मार्टफोन बदलत असल्याच्या या काळामध्ये, टिकाऊ, सोयीस्कर व उपयुक्त असणारे जुने फीचर फोन कालबाह्य ठरले आहेत. नॅनोसेकंदांमध्ये स्टॉकचे दर बदलत असताना, कोणत्या किंमतीला स्टॉक खरेदी करायचे, याची वाट बघत बसणे महागडे ठरू शकते. उदाहरणार्थ, एखादा शेअर १०० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत घसरल्यावर त्या दराने तुम्ही शेअर खरेदी केला तर तो आणखी घसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वाट बघण्याचा पूर्वग्रह दूर करा. तुम्ही योग्य दर देत आहात, असे समजून निर्णय घेण्यापूर्वी स्टॉक किंवा फंडांच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण करा.

घाबरून जाऊ नका
तुम्ही घाबरलात तर भीती दाखवणारे घटक कधीही संपणार नाहीत. नुकसान होईल, या भीतीने आपल्यापैकी अनेक जण बाजारातील तेजी-मंदीपासून दूर राहतात. पण हे बरोबर नाही. नुकसानाला पूर्णतः टाळल्याने (किंवा नुकसान टाळण्याचा पूर्वग्रह बाळगल्याने) काही चांगल्या संधी गमवाव्या लागू शकतात. काहीतरी नकारात्मक ऐकले की अनेक जण हवालदील होतात आणि गुंतवणुकीची विक्री करून टाकतात. यावर स्मार्ट पर्याय म्हणजे, तेजी-मंदीशी नीट ओळख करून घेणे आणि स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता समजल्यावर निवडक, दर्जेदार स्टॉक्समध्ये किंवा फंडामध्ये गुंतवणूक करा. याचप्रमाणे, उच्च किंमत किंवा एनएनव्ही या कारणाने तुम्ही एखाद्या स्टॉकपासून किंवा फंडापासून दूर राहायचे ठरवले, तर दर्जेदार गुंतवणूक करण्याची संधी तुम्ही कदाचित गमावू शकता.

एकूणच, सगळ्यात आधी निरोप या पूर्वग्रहकांना द्या आणि कोणत्याही म्युच्युअल फंडात किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZYACB
Similar Posts
‘कंपनी कर कमी केल्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला’ मुंबई: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार असून, रोजगारनिर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार असून त्याबद्दल मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे
‘ओयो’ करणार चौदाशे कोटींची गुंतवणूक मुंबई : ‘ओयो हॉटेल्स आणि होम्स’ कंपनीने भारतात आणि दक्षिण आशिया भागात तब्बल १४०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
कॉईनेक्समध्ये पँटेरा कॅपिटल आणि बीनेस्क्टची गुंतवणूक मुंबई : आपले आपले आगळेवेगळे बिझनेस मॉडेल भक्कम करण्यासाठी तसेच भारतातील ब्लॉकचेन क्षेत्राच्या चौकटी मोडून टाकण्याची योजना सफल करण्यासाठी, ‘कॉइनेक्स’ या भारतातील पहिल्या मल्टि-क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आणि ट्रेडिंग व्यासपीठाला ‘पॅण्टेरा कॅपिटल’ तसेच ‘बीनेस्क्टपीटीई लिमिटेड’ यांसारख्या जागतिक स्तरावरील गुंतवणूक कंपन्यांकडून निधी प्राप्त झाला आहे
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ‘पेटीएम मनी’द्वारे शक्य मुंबई : आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आपल्या दर महिन्याच्या एसआयपी किंवा एक रकमी गुंतवणूक ‘पेटीएम मनी’ अॅपच्या सहाय्याने करता येईल. या अॅपद्वारे आता युपीआय आधारित पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत 'पेटीएम मनी'चे संचालक प्रवीण जाधव म्हणाले, 'सर्व प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language